संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई—गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर परिसरात सुरू असतानाच ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका थेट प्रवाशांना आणि नागरिकांना बसत आहे. संगमेश्वर बसस्थानकाकडे जाणारे प्रवेशद्वार तसेच बाजारपेठेकडे जाणारा रस्ता चिखलात रुतल्याने नागरिकांना अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गाच्या कामासाठी खोदकाम केलेल्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ तर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून बस पकडण्यासाठी येणार्या प्रवाशांना या चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच सामान घेऊन प्रवास करणार्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराचीच ही अवस्था असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गाचे काम करताना नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी पर्यायी व सुरक्षित मार्ग ठेवणे, पावसाचे पाणी आणि चिखलाचा निचरा करणे तसेच प्रवेशद्वार सुस्थितीत ठेवणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. संगमेश्वरच्या बाजारपेठेकडे जाणार्या मार्गाचीही अशीच अवस्था झाली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या मार्गावर चिखल साचल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिखलामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून वाहनचालकांनाही सावधगिरीने मार्गक्रमण करावे लागत आहे.
येत्या काही दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी संगमेश्वर परिसरात दाखल होणार आहेत. अशा वेळी बसस्थानक आणि बाजारपेठेकडे जाणार्या प्रमुख मार्गाची ही अवस्था कायम राहिल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी बसस्थानकाचे प्रवेशद्वार आणि बाजारपेठेकडे जाणारा रस्ता चिखलमुक्त करून नागरिकांसाठी सुरक्षित व सुकर मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे. महामार्गाचे काम सुरू असले तरी नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता ठेकेदाराने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)

































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.