loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन; SIR प्रक्रियेवर चर्चा

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने दोडामार्ग येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. जिल्हा सरचिटणीस देवानंद लुडबे आणि जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या SIR प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आगामी कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या कथित अमानुष गोळीबार व लाठीहल्ल्याचा बैठकीत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या घटनेबाबत उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस सोनू गवस यांनी केले, तर शहराध्यक्ष सुधीर गवस यांनी आभार मानले. बैठकीस सुधीर चांदेलकर, नंदकिशोर प्रसादी, धनशाम कर्पे, गजानन वाडकर, संदीप नाईक, श्रीकृष्ण गवस, रॉकी फर्नांडिस, पीटर फर्नांडिस, मोहन माळकर, अशोक मोरजकर, दिनानाथ उगवेकर, मदन सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg