loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या फुटबॉल संघांचे घवघवीत यश

खेड (प्रतिनिधी) - दिनांक 7 सप्टेंबर व 9 सप्टेंबर 2026 रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या 14 व 17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक तर 19 वर्षाखालील फुटबॉल संघाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द आणि कौशल्याचे प्रदर्शन करणार्‍या खेळाडूंमध्ये 14 वर्षाखालील संघात अथर्व जयराम हलगावर, तमीम फईम मुकादम, तलाह फईम मुकादम, ऱ्हिदान प्रितम पाटणे, हर्ष ज्ञानेश्वर शिंदे, स्वानंद सुखदेव भोसले, सक्षम शंकर माने, बशर मुनीर सरगुरोह, निहार सिद्धेश आंब्रे, देवांश विजय नलावडे, जय सुशांत पाडलेकर, कृष्णा नितीन जाधव, अशर अखलआक चौगले, अब्दुल्ला इम्रान डावरे, अद्विक मंगेश झावरे, आवेश रहीम खान यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

17 वयोगटाखालील संघात अथर्व सचिन चव्हाण, नाझील नजीब परकार, आयुष रमेश जाधव, संघरत्न आनंद शेळके, शौर्य वीरेंद्र जैन, वेदांग विनायक चितळकर, लक्षदीप प्रदीप क्षीरसागर, प्रणव पांडुरंग देवकाते, पार्थ दिलीप बोडेकर, तन्मय प्रभाकर शिगवण, झुहैब मुनीर सरगुरोह, आर्यन दीपक शिंदे, अभिनव कुमार शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.19 वयोगटाखालील संघात आर्यन दीपक शिंदे, जतीन नितीन यादव, परम जगन्नाथ गावडे, हरेश हैदरअली सुर्वे, स्मित सुधीर तांबे, सोहम श्रीकांत देवळेकर, राम संदीप करवा, मो. कैफ रफिक जस्नाईक, मिहीर चंदन वंडकर, तनिष्क मंदार वाईकर, राहुल नारायणलाल रायका, जीशान समीर शेख, हर्ष अमर दळवी यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

टाईम्स स्पेशल

क्रीडा शिक्षक कृणाल चव्हाण यांनी वरील खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी स्कूलच्या संपूर्ण संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संस्थेचे चेअरमन माननीय डॉ. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg