loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशभक्तांसाठी महत्वाची बातमी, मध्य रेल्वेतर्फे ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या, ८ सप्टेंरपासून आरक्षण सुरू

मुंबई - गणेश उत्सवाच्या दिवसात चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची ओढ लक्षात घेता या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 34 अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान धावणार असून, यामध्ये 4 आरक्षित विशेष सेवांचा आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान 30 अनारक्षित मेमू सेवांचा समावेश आहे.लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर एकूण चार विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गाडी क्रमांक 01003 ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 7.50 वाजता सुटून मडगाव येथे रात्री 11.45 वाजता पोहोचेल. ही गाडी 16 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर 2026 रोजी धावणार आहे. गाडी क्रमांक01004 ही मडगाव येथून सायंकाळी 4 वाजता सुटून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.05 वाजता पोहोचेल. ही सेवा 15 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर 2026 रोजी उपलब्ध असेल.गणेशोत्सव विशेष या गाड्यांमध्ये ३ वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे, ८ शयनयान डबे, ६ सर्वसाधारण द्वितीय श्रेणीचे डबे आणि २ द्वितीय श्रेणी आसनासह गार्ड ब्रेक डबे असतील.

या विशेष गाड्यांसाठी आरक्षण ८ सप्टेंबर २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. सर्वसाधारण शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग 'रेलवन' या ॲपद्वारे प्रवाशांना करता येईल. तसेच प्रवासी तिकिटांचे तत्काळ आरक्षण करण्यासाठीही 'रेलवन' ॲपचा वापर करता येऊ शकतो. या विशेष गाड्यांच्या थांब्यांची सविस्तर माहिती व वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg