loader
Breaking News
Breaking News
Foto

एकात्मिक रोग व्यवस्थापन (IDM) प्रात्यक्षिक संपन्न

संगलट (इक्बाल जमादार) - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) अंतर्गत "हरितसंगिनी" विद्यार्थी गटाच्या वतीने कोळथरे येथे एकात्मिक रोग व्यवस्थापन (IDM) विषयक प्रात्यक्षिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आंबा, काजू, नारळ, सुपारी, पपई, हळद आणि केळी या पिकांमधील प्रमुख रोगांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व एकात्मिक रोग व्यवस्थापन पद्धतींबाबत माहिती देण्यात आली. बागेतील स्वच्छता, रोगग्रस्त भाग काढून नष्ट करणे, योग्य निचरा, जैविक नियंत्रण तसेच गरजेनुसार शिफारशीनुसार बुरशीनाशकांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रात्यक्षिकाला शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता शिर्के मॅडम, डॉ. एन. व्ही. दळवी, डॉ. एस. बी. थोरात, डॉ. राऊत, डॉ. दोसाणी, डॉ. काळे, डॉ. एस. एस. तोरणे तसेच डॉ. गुडदे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमात धनश्री चौगुले, श्रावणी कालेकर, साक्षी वालपकर, श्रद्धा कोतवाल, विशाखा आंबवले, यशिका करकेरा, अनाया वराडकर, सानिका नाकील, अनुजा साळुंखे, सिद्धी धनवडे, सानिया पासीलकर, दिया म्हादये, सृष्टी पुरी आणि श्रावणी आरेकर या विद्यार्थिनींचा सहभाग होता. या उपक्रमामुळे विविध पिकांमधील रोगांचे प्रभावी व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्याबाबत शेतकरी व ग्रामस्थांमध्ये जनजागृती झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg