loader
Breaking News
Breaking News
Foto

नाभिक संघटनेतर्फे संजू परब यांचा सत्कार; रक्तदान शिबिराचे उद्घाटनचे

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संजू परब यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत, रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नाभिक संघटनेच्या आपण कायम सदैव पाठीशी राहणार असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमास नाभिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, ओबीसी मोर्चा तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर,युवासेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस, उपतालुका प्रमुख राकेश पवार, राजू मुळीक संदीप तळवणेकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg