loader
Breaking News
Breaking News
Foto

बाजारपेठांतील गर्दीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता; प्रितम म्हात्रे यांचे वाहतूक पोलिसांना पत्र

पनवेल :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रमुख बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती, सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, पनवेलसह आसपासच्या ग्रामीण भागातूनही गणेशभक्त मोठ्या संख्येने येत असल्याने वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, पनवेल यांना पत्र पाठवून प्रमुख बाजारपेठा, चौक व प्रवेशमार्गांवर अतिरिक्त वाहतूक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रात नमूद केल्यानुसार, अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण ठेवून आवश्यक ठिकाणी तात्पुरते वाहनतळ, दिशादर्शक फलक व पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, तसेच रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत राहील याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या कार्यासाठी पोलीस प्रशासनाला लागणारे सर्वतोपरी सहकार्य जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून केले जाणार आहे. प्रशासन व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून गणेशोत्सव सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा आणि गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी बोलताना प्रितम म्हात्रे म्हणाले, गणेशोत्सव हा सर्वांच्या श्रद्धेचा व आनंदाचा उत्सव आहे. या काळात गणेशभक्तांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने वेळीच योग्य ती खबरदारी घ्यावी. आमची जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था या कामी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे. याबाबतचे पत्र पोलीस उपायुक्त (परिमंडळ–२, पनवेल), पोलीस उपायुक्त (वाहतूक, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय), सहायक पोलीस आयुक्त (पनवेल विभाग), आयुक्त (पनवेल महानगरपालिका) तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg