loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या रत्नागिरीत; भाजपच्या संघटनात्मक बैठकीत ‘टाईट’ होणार राजकीय गणित! रत्नागिरीचा तिसरा दौरा, पदाधिकार्‍यांना कानमंत्र मिळणार?

रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या रत्नागिरी दौर्‍यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चव्हाण यांचा रत्नागिरीतील हा तिसरा दौरा असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या दुपारी ३ वाजता स्वयंवर मंगल कार्यालयात दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पक्षाच्या घटनेनुसार प्रदेश कार्यकारिणी झाल्यानंतर सात दिवसांत जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक न राहता आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रदेशाध्यक्षांच्या दौर्‍याची जोरदार तयारी सुरू केली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यातील भाजप संघटना आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न होणार आहे.

टाईम्स स्पेशल

या दौर्‍यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आमदार योगेश सागर, निरंजन डावखरे आणि प्रमोद जठार उपस्थित राहणार आहेत. दक्षिण रत्नागिरीची बैठक झाल्यानंतर चव्हाण उत्तर रत्नागिरीची बैठक चिपळूण येथे घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्ह्यातील बदलते राजकीय समीकरण पाहता, प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg