loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात ‘नमो उद्यान’ उभारणार, आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमीपूजन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहराचा वाढता विस्तार, नागरिकांची वाढती गरज आणि शहरामध्ये नागरिकांना विरंगुळा, व्यायाम तसेच आनंददायी वातावरण मिळावे, या उद्देशाने ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे उद्यान लांजावासीयांसाठी एक सुंदर आणि शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असून विकासाचा नवा चेहरसा नागरिकांसमोर येणार असल्याचे प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी लांजा येथे नमो उद्यान च्या भूमिपूजनाचा वेळी केले. लांजा शहरात एक कोटी खर्च करून भव्य आणि आकर्षक ’नमो उद्यान, उभारण्यात येणार आहे. या उद्यानचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी आमदार सामंत बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष बाबा लांजेकर, बांधकाम सभापती वैभव जोईल, पाणी सभापती गुल्या नेवरेकर, महीला बालकल्याण सभापती प्रणाली तेली, मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, योगेश कावतकर, सर्व नगरसेवक, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, जयवंत शेट्ये, नाना मानकर, गणी हसन मुल्लाणी, आदीसह नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी आमदार किरण सामंत यांनी लांजा शहराच्या विकासाला आपले प्राधान्य असल्याचे सांगून लांजावासीयांना अभिमान वाटेल, असे नमो उद्यान उभारले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली विविध कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. या उद्यानामध्ये नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, नागरिकांसाठी फिरण्यासाठी प्रशस्त परिसर, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची सुविधा, हिरवाई आणि सुशोभीकरणाच्या माध्यमातून आकर्षक वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ नागरिकांना निवांत वेळ घालवण्यासाठी तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकामांमध्ये नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन कामे करण्यावर भर दिला जाणार आहे. लांजा शहरासह मतदारसंघातील विविध भागांमध्ये पायाभूत सुविधा, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या हिताची कामे करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg