loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गच्या प्रश्नांवर युवा आक्रमक! क्रांती दलाचा पुढाकार; तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणला निवेदन

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील रस्ते आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर दोडामार्ग क्रांती दलाचे युवा कार्यकर्ते आक्रमक झाले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करून खड्डे व धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच खबरदारी घ्यावी, अशी भूमिका युवांनी मांडली. तसेच गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज खांब, वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर व इतर यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली. या उपक्रमात सर्व युवा सहभागी असून कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग नसल्याचे क्रांती दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांसाठी युवांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधले असून, आता संबंधित विभागांनी प्रत्यक्ष कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg