loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योजक विजय कुवळेकर यांना मातृशोक

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कडवई येथील राज मंडप डेकोरेटर्सचे मालक तथा उद्योजक विजय विठ्ठल कुवळेकर यांच्या मातोश्री सुनिता विठ्ठल कुवळेकर यांचे आज सकाळी १०.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुवळेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कडवई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुनिता कुवळेकर या प्रेमळ, मनमिळावू आणि कुटुंब वत्सल स्वभावाच्या होत्या. दीर्घ आजाराशी त्यांनी धैर्याने सामना केला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपल्या प्रेमळ मातृछत्राला मुकले असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमधून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६ वाजता कडवई-किंजळकरवाडी येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg