रत्नागिरी : हिमालयाच्या कुशीत कोकणच्या क्रीडा पर्यटनाचा संदेश घुमवणारी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची विशेष प्रोमो रन लेह येथे उत्साहात पार पडली. देशभरातील सुमारे २०० धावपटूंनी या उपक्रमात सहभाग घेत कोकणातील या वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेली तेरा वर्षे लडाखमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी लेह मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेसाठी भारतभरातून सुमारे सहा हजार धावपटू लेहमध्ये दाखल झाले आहेत. या निमित्ताने “कोकणवासीयांनी जगभरातील धावपटूंसाठी आयोजित केलेली मॅरेथॉन” अशी ओळख निर्माण झालेल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे प्रमोशनही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. या प्रचार मोहिमेसाठी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची टीम २० ऑगस्ट रोजी रत्नागिरीहून रवाना झाली होती. सुरत, वडोदरा, गांधीनगर, इंदूर, जयपूर, आग्रा, गाझियाबाद आदी रत्नागिरीशी रेल्वेने जोडलेल्या शहरांमध्ये विविध रनिंग कम्युनिटींना भेटी देत ही टीम लेहमध्ये पोहोचली. या उपक्रमाचे प्रमुख आणि सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी हे जगातील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या खारदुंग-ला चॅलेंज (७२ किमी) मध्ये सहभागी झाले असून जवळपास ३०० स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश आहे. तसेच अभिजीत पड्याळ हे ४२ किमी फुल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.
गेल्या चार वर्षांपासून अधिकाधिक धावपटूंना कोकणाकडे आकर्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लेह मार्केट – शांती स्तूप – लेह मार्केट या मार्गावर विशेष प्रोमो रन आयोजित करण्यात आली. या रनमध्ये देशातील नामवंत धावपटूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये १५ वेळा कॉम्रेड्स मॅरेथॉन पूर्ण केलेले सतीश गुजराण, भारतातील कॉम्रेड्स मॅरेथॉनमधील वेगवान धावपटू आणि प्रशिक्षक योगेश सानप, एसकेएफ गोवा रिव्हर मॅरेथॉनच्या व्यवस्थापन समितीचे दिनेश हेडा, तेलंगणा पोलिसांच्या अँटी करप्शन विभागातील पिल्ली राजू, मंगळुरूच्या महवीश हुसेन, हिमाचल प्रदेशातील अल्ट्रा रनर तेनझिंग डोलमा यांच्यासह अरुणाचल प्रदेशापासून गुजरातपर्यंत आणि आसेतू हिमाचलपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यातील धावपटू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील कोणत्याही मॅरेथॉनचे अशा पद्धतीने थेट लडाखमध्ये येऊन प्रमोशन यापूर्वी कधीही झाले नसल्याची भावना उपस्थित धावपटूंनी व्यक्त केली. कोकणवासीय ज्या उत्साहाने या स्पर्धेचा प्रचार करत आहेत, त्यामुळे आता कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनला प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी यायलाच हवे, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी दिली. या प्रचार मोहिमेत रुचकर प्रॉडक्ट्सचे सुनील सहस्रबुद्धे यांनी विशेष सहकार्य केले. रत्नागिरीपासून लेहपर्यंत भेटलेल्या सर्व रनिंग कम्युनिटींना तसेच लेहमधील धावपटूंना रुचकरची हापूस आंब्याची आंबावडी भेट देण्यात आली. या आंबावडीची चव घेतल्यानंतर “आंबावडी इतकी स्वादिष्ट असेल तर कोकण किती सुंदर असेल!” अशा शब्दांत अनेक धावपटूंनी कौतुक व्यक्त केले.
कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनची आणखी एक मोठी जमेची बाजू म्हणजे तिचा एकदिशीय (Point-to-Point) मार्ग. बहुतांश हाफ मॅरेथॉनमध्ये धावपटूंना त्याच मार्गाने परत यावे लागते; मात्र कोकण कोस्टलमध्ये संपूर्ण २१.१ किमीचा मार्ग प्रत्येक क्षणी नवा अनुभव देणारा आहे. यामुळे देशभरातील धावपटूंमध्ये या स्पर्धेबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. येत्या ३ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या चौथ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केला. दरम्यान, लेहमध्ये प्रचार मोहीम सुरू असताना रत्नागिरीमध्ये टीम पंचकन्या मानसी मराठे, अंकिता पाटकर, स्नेहल कलाल, केतकी लेले आणि राधा बसणकर या दर रविवारी नियमितपणे मोफत प्रॅक्टिस रनचे आयोजन करत आहेत. बाहेरून जितके धावपटू येतील तितक्याच संख्येने रत्नागिरी जिल्ह्यातील धावपटूंनीही सहभागी व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सलग ११० रविवार ही मोफत प्रॅक्टिस रन अखंडपणे सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम ३ जानेवारी २०२७ रोजीच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये तसेच २८ मार्च २०२७ रोजी होणाऱ्या गणपतीपुळे हाफ मॅरेथॉनमध्ये निश्चितपणे दिसून येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. हिमालयाच्या कुशीत कोकणचा आवाज दुमदुमविणाऱ्या या उपक्रमामुळे “कोकणची मॅरेथॉन म्हणजे कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन” हे समीकरण अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे.







































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)










































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.